Loading...

Travel Stories

भ्रमणगाथा

Sandip Joglekar
Share
3 Min Read

एका शनिवारी अचानक घनगड वरती मुक्कामाला जायचे ठरले.  हो नाही करता करता ३-४ जण, तयार झाले, सामानाची जमावाजमव केली. वरती प्यायच्या पाणी उपलब्ध नसल्याने पायथ्याशी असलेल्या एकोले गावात जेवण करून मग हा सोपा गड रात्री सर करायचे ठरले.  एकोले गाव हे अगदीच छोटे पण टुमदार, तिथल्या एका घरामध्ये जेवणाची सोय झाली. तिथल्या मावशींनी मस्त चुलीवरच्या भाकरी आणि गरम गरम झुणका टाकला. भरपूर मनसोक्त जेवण केल्यावर पुन्हा गडावर जायचे खर तर जीवावर आले, पण पण थोडा वेळकाढू पणा करून वरती निघालो, पौर्णिमेची रात्र असल्याने भरपूर चांदणे पडले होते. घनगड हा तास अगदीच छोटेखानी किल्ला, अर्ध्या तास चढल्यावर एक शिडी लागली, एका मागोमाग एक चढून वरती गेलो तेव्हा एक छोटी गुहा लागली, पण मग थोडी चर्चा करून अजून वरती जाऊन तंबू लावायचे ठरले. दोन मावळे वरती पोचले, मग आम्ही पण अजून १५ मिनिटांच्या चढणी नंतर वरती पोचलो, त्यातल्या त्यात एक सपाट जागा बघून तंबू लावायला सुरुवात केली. आजूबाजूला वाळलेले गावात भरपूर , आणि त्यात उंदीरांचा सुळसुळाट प्रचंड.  आम्ही गावातून थोडी लाकडे नेली होती. ती  पेटवून मस्त गप्पा मारत बसलो.  रात्रभर प्रचंड वारा होता. पहाटे पहाटे थोडे दिसू लागताच आम्ही गडावर फेरफटका मारला, पूर्वेकडून सूर्य नारायणाचे आगमन होताच मावळचा संपूर्ण गडावरून दिसु लागला.  दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याचा गडावर अभाव असल्याने, चहाचा बेत रद्द करावा लागला. उन्हे वाढू लागताच पाय तंबू आवरले आणि परत खालती गावात येऊन मस्त नाश्ता केला.

घनगड कडे जायला दोन रस्ते आहेत. एक ताम्हिणी घाटातून आणि दुसरा लोणावळ्यावरून. मुळशी गेल्यानंतर अंदाजे २० किमी अंतरावर उजवीकडे एक रास्ता आहे (ओढ्यावरचा एक छोटासा पूल आहे) तिकडे जायचे, पुढचा रास्ता जरा खराब आहे.  डावीकडे थोडे गेल्यानंतर प्लस valley चे  अत्यंत सुंदर दृश्य दिसते. तिथून साधारण पाऊण तासाच्या ड्राईव्ह नंतर एकोले गाव लागते. गडाची उंची साधारण ३००० फूट.

पुणे-मुळशी-ताम्हिणी -निवे -(उजवीकडे वळणे )- भांबुर्डे- एकोले-घनगड

लोणावळा मार्गे यायचे झाल्यास खालील रास्ता :

पुणे-लोणावळा-अँबी valley रस्ता- भांबुर्डे-एकोले-घनगड

Add a comment

Please Login to comment